भ्रष्टाचार प्रकरणी शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचेवर प्रशासकिय कारवाई; तर सरपंच यांच्या कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे.
टोकडे-मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी विठोबा द्यानद्यान यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक अशा सुमारे ६५ दिवस चाललेल्या आंदोलनास मोठे यश मिळाले आहे. त्रयस्थ समितीचा तिसरा अहवाल प्राप्त झाला असून त्यात दोषी आढळल्याने उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित उप अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची प्रशासकिय कारवाई तर ग्रामसेविका यांचा शिस्तभंगाची कारवाई चा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेस पाठवला आहे. जि. प. नाशिक मध्ये पहिल्यांदाच अधिका-यांच्या कारवाई मुळे खळबळ उडाली आहे. तर सरपंच यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला आहे. ग्रामसेविका यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. टोकडे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांनी विठोबा द्यानद्यान यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती मालेगाव गेटसमोर दिर्घ आंदोलन केले होते. कोरोणाचा प्रादुर्भाव बघता व गट विकास अधिकारी यांनी आंदोलन मागे घेण्याचा विनंती आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. सदर प्रकरणात भ्रष्टाचा-यांनी शासनाची हडप केलेली रक्कम शासकिय प्रकलनानुसार वसुल व्हावी व फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आंदोलकांच्या मागणीला योग्य न्याय न मिळाल्यास काही काळासाठी संस्थगीत केलेले आंदोलन तीव्रपणे छेडण्यात येईल असा इशारा विठोबा द्यानद्यान यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment