राष्ट्रीय हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल
मालेगाव : महानगर पालिका होऊन दोन दशके उलटली आहेत तरी देखील आजुन पर्यंत मूलभूत सोयीसविधांचा अभाव आहे. राजकीय अनास्थेमुळे शहर विकासापासून वंचींत आहे. ड्रेनेज, रस्ते, उद्यान, खेळाची मैदाने, आरोग्य सुविधा, प्रदूषण रोखण्यासाठी व पर्यावरण संवर्धन करण्यासाठी उपाय योजना निर्माण होऊ शकल्या नाहीत. अनेक महत्त्वकांशी प्रकल्प अपूर्ण आवस्थेत आहेत. भ्रष्ट्राचार बोकाळला आहे. अश्या सर्व ज्वलंत प्रश्नांना सोडविण्यासाठी कायदेशीर आधार घेत राष्ट्रीय हरित लवादाकडे फहीम युसुफ अब्दुल्ला, निखिल बाळासाहेब पवार, असिफ अब्दुल्ला यांनी जनहित याचिका दाखल करत सखोल चौकशी करत दोषींवर कठोर कारवाई करावी मालेगावच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णयांवर अमंलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडे फहीम अब्दुल्ला, निखिल पवार व असिफ अब्दुल्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत १) म्हाळदे येथील घरकुल मुदत संपून ८ वर्षाचा कालावधी लोटला तरी पूर्ण करण्यात आली नाही. या प्रकल्पाची गुणवत्ता तपासावी, प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार व मक्तेदार पंधे अँड क...