काळजी घ्या! 'ही' आहेत करोना संसर्गाची तीन नवीन लक्षणे
Coronavirus काळजी घ्या! 'ही' आहेत करोना संसर्गाची तीन नवीन लक्षणे
करोनाचा (Coronavirus) कहर अद्यापही थांबला नसून नवीन रुग्णांमध्ये लक्षणे आढळत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. अमेरिकेतील 'सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन' संस्थेने करोनाची तीन नवीन लक्षणे (Coronavirus infection symptoms) सांगितली आहेत.
काळजी घ्या! करोना संसर्गाची तीन नवीन लक्षणे वॉशिंग्टन: जगभरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून एक कोटींहून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहे. करोना विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर आव्हाने वाढत आहेत. त्यातच आता अमेरिकेच्या 'सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन'ने करोनाची तीन लक्षणे सांगितले.
याआधी सुका खोकला, ताप, थकवा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे आधी लक्षणे करोनाबाधितांची असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता 'सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन'ने करोनाची आणखी तीन लक्षणे सांगितली आहेत. यामध्ये नाक सतत वाहणे, अतिसार आणि उलटी ही लक्षणे करोनाच्या आजाराची असू शकतात. या आजारांना सामान्य आजार न समजण्याचा सल्ला 'सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशन'ने (सीडीसी) दिला आहे
Comments
Post a Comment