जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार १९४ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज;सद्यस्थितीत १ हजार ६१५ रुग्णांवर उपचार सुरू

*पॉझिट्व्ह अपडेट्स: रात्री. ८:०० वाजता*   

*जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार १९४  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज;*
*सद्यस्थितीत १ हजार ६१५  रुग्णांवर उपचार सुरू*
 
*नाशिक, दि. २९ जून, २०२० (जिमाका वृत्तसेवा) :*

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार १९४  कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून रुग्ण पुर्णपणे बरे होण्याची टक्केवारी ५४.२७ इतकी आहे. सद्यस्थितीत १ हजार ६१५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक जिल्हा रूग्णालय ७५ , नाशिक महानगरपालिका १०९३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय १०९,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७७, नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. व सी.सी.सी. १८०, गृह विलगीकरण ८१ असे एकूण १ हजार ६१५ कोरोना बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.तसेच जिल्ह्यात आजपर्यंत ४ हजार ४३  कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

*आज दाखल रुग्ण :*

आज जिल्ह्यात नव्याने नाशिक जिल्हा रूग्णालय ११ , नाशिक महानगरपालिका २७५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय ०३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्र १५, तर नाशिक ग्रामीण डी.सी.एच.सी. , सी.सी.सी. १८३  व गृह विलगीकरण ०७ असे एकूण ४९४  संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:*

नाशिक ग्रामीण मधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.१३ टक्के, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४१.७६, मालेगाव मनपा मधून ७८. २७ टक्के व जिल्हा बाहेरील ६१. २९ टक्के इतके असून संपूर्ण जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२७ टक्के इतकी आहे. 

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ४५ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १०४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७४ व जिल्हा बाहेरील ११  अशा एकूण २३४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

*लक्षणीय :*

◼️४ हजार ४३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार १९४ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १ हजार ६१५ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️आजपर्यंत निगेटीव्ह अहवालांची संख्या १६ हजार ४०३.

*(वरील आकडेवारी आज रात्री. ८.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

             

Comments