जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार २३० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज;सद्यस्थितीत १ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरू

*पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी ११ : ०० वाजता*

 जिल्ह्यात आजपर्यंत २ हजार 
२३०  कोरोना रुग्णांना डिस्चार्ज;

*सद्यस्थितीत १ हजार ५९८  रुग्णांवर उपचार सुरू*
 
*नाशिक, दि. ३० जून, २०२० (जिमाका वृत्तसेवा) :*

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ हजार २३० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ७६, चांदवड ०८, सिन्नर ४४, देवळा ०२, दिंडोरी २१, निफाड ५८,  नांदगांव ०९,येवला ३२, त्र्यंबकेश्वर १७, कळवण ०१ ,बागलाण १३, इगतपुरी २०, मालेगांव ग्रामीण १३ असे एकूण  ३१४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, पेठ,  या दोन तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९७ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १५० तर जिल्ह्याबाहेरील ३७  असे एकूण १ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ४ हजार ६२  रुग्ण आढळून आले आहेत.

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ४५ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १०४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७४ व जिल्हा बाहेरील ११  अशा एकूण २३४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

*लक्षणीय :*

◼️४ हजार ६२  कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ हजार २२० रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात  १ हजार ५९८ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

*(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

                 

Comments