मालेगाव महापालिका प्रशासनाच्या मसगा कोविड सेंटर मधुन 16 जणांच्या दोन कुटुंबांची कोरोनामुक्ती



 मालेगाव महापालिका प्रशासनाच्या मसगा कोविड सेंटर मधुन 16 जणांच्या दोन कुटुंबांची  कोरोनामुक्ती

मालेगाव मनपा : मालेगाव महापालिकेने तयार केलेल्या सी.सी.सी. सेंटर येथुन आज दि.2 जुलै रोजी दोन कुटुंब आणि इतर 1 असे 16 व्यक्तींनी औषध उपचारास योग्य प्रतिसाद दिल्याने व आज घडीला कोणतेही लक्षण नसल्याने नवीन डिस्चार्ज धोरणानुसार कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडल्याने नागरीकांना कोरोनामुक्त करण्याची मालेगाव महापालिकेच्या उत्तम आरोग्य सेवेची किमया निरंतर सुरु आहे. आज मितीस मसगा सी.सी.सी सेंटर मध्ये 30 व डी.सी.एच.सी मध्ये 14 असे एकुण 44 रुग्ण दाखल आहेत.

मालेगाव महानगरपालिकेने आयुक्त त्रंबक कासार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने नियोजन बध्द कार्यक्रमानुसार मुलभुत सोयीसुविधांसह मनपा आरोग्य विभागाव्दारे कोरोनाबाधित रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करुन देऊन नवीन डिस्चार्ज धोरणानुसार नागरीकांना कोरोनामुक्त करण्याच्या यशस्वी मालेगाव पॅटर्न ची घोडदौड नित्यक्रमाने सुरु आहे. संगमेश्वरातील दोन कुटुंबातील 15 सदस्यांसह इतर 1 असे आज एकुण 16 व्यक्तींना मनपा कोविड सेंटर मधुन कोरोनामुक्त करुन आनंदी वातावरणात घरी सोडण्यात आले. यात अनुक्रमे 52,45, 43,25,23,09,वर्षीय महिलांसह 08,06,02 या लहान मुलींचा समावेश होता तर 55,50,44,40,29,20 वर्षांच्या पुरुषांसह 4 वर्षाच्या लहान मुलाचा समावेश होता. उक्त दोन्ही कुटुंबातील लहान मोठे सर्वच सदस्य कोरोना बाधित असल्याने मनपाच्या कोविड सेंटर मध्ये दि.23 रोजी दाखल झालेले होते. आज त्या सर्वांची प्रकृती ठणठणीत बरी झाली असुन मनपा उपायुक्त कापडणीस, प्रभाग समिती क्रमांक 1चे सभापती राजाराम जाधव, यांच्यासह उपस्थित इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन आणि फुलांची उधळन करुन आरोग्याच्या शुभेच्छांसह डिस्चार्ज करुन मनपा ॲम्ब्युलन्स व्दारे घरी सोडण्यात आले. कोरोनामुक्त कुटुंबानी मालेगाव महापालिका प्रशासनाने रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या उत्तम सुविधा व इतर व्यवस्थे बाबत समाधानासह सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांना येथील डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी यांनी फुल देऊन शुभेच्छा दिल्यात. 
 
  यावेळी प्रभाग समिती सभापती राजाराम जाधव, उपायुक्त (विकास) नितिन कापडणीस, सामान्य रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. प्रल्हाद गुठे, डॉ.हितेश महाले, आरोग्य  अधिकारी सपना ठाकरे, नगरसेवक मदनबापु गायकवाड, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, डी.सी.सी.एच.सेंटर चे नोडल अधिकारी तथा बालरोग तज्ञ डॉ. पुष्कर अहिरे, सी.सी.सी.सेंटर चे नोडल अधिकारी डॉ.संदिप खैरणार, डॉ.जतिन कापडणीस, डॉ. स्वप्निल खैरणार, इन्चार्ज सिस्टर सुवर्णा कुमावत, विनया भालेकर, ब्रदर भरत देवरे, फार्मासिस्ट महेश सोनवणे, तुषार पाटिल, जिजा सोनवणे, एलिना जॉन मायकल या परिचारीकांसह संदिप काळुंखे, वॉर्डबॉय, ॲम्ब्युलन्स चालक यांच्यासह सफाई व इतर वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. 
   
            जनसंपर्क अधिकारी 
    मालेगाव महानगरपालिका मालेगाव.

Comments