मालेगाव सामान्य रुग्णालयाला लक्ष्य मानांकनसामान्य रुग्णालयाने पटकाविला राज्यात प्रथम क्रमांकडॉ. हितेश महाले
मालेगाव, दि. 06 (उमाका वृत्तसेवा)सामान्य रुग्णालयास केंद्र शासनाच्या आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे लक्ष्य मानांकनाने गौरविण्यात आले असून संपूर्ण राज्यात मालेगावच्या सामान्य रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकावल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हितेश महाले यांनी सांगिले.
भारत सरकारच्या स्वास्थ एवं परिवार कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत संपूर्ण देशभरातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यात मालेगावच्या सामान्य रुग्णालयाच्या प्रसुती विभागास 100 पैकी 96 तर शस्त्रक्रिया विभागाला 100 पैकी 97 गुण मिळाले. गुजरात आणि दिल्ली येथून आलेल्या पथकाने डिसेंबर 2019 मध्ये येथील सामान्य रुग्णालयास भेट देवून विविध विभागांची पाहणी करून केंद्र शासनाच्या आरोग्य विभागास अहवाल सादर केला होता. यामध्ये रुग्णांना मिळणारी सुविधा, उपलब्ध खाटा, रुग्ण सेवा व रुग्णांचे अधिकार आदी बाबींचा समावेश होता. सामान्य रुग्णालयास लक्ष्य मानांकन मिळवून देण्यात तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर डांगे, शस्त्रक्रिया कक्ष प्रमुख डॉ.विना लोढा, डॉ.भामरे, डॉ.गौतम शिलवंत, सी.एम.शिंदे, जयमाला पवार, अलका पवार, तुषार सुर्यवंशी, डॉ.महेंद्र पाटील, डॉ.योगेश पाटील अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.हितेश महाले यांचा मोलाचा वाटा आहे.
*लक्ष्य मानांकनामुळे जबाबदारीमध्ये वाढ : डॉ.प्रल्हाद गुठे*
सामान्य रुग्णालयास केंद्र शासनाच्या आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे लक्ष्य मानांकनाने गौरविण्यात आले असून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची ही पावती आहे. लक्ष्य मानांकनामुळे जबाबदारीमध्ये वाढ झाली असून यापुढेही सामान्य रुग्णालयातर्फे उत्कृष्ट रुग्ण सेवा देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रल्हाद गुठे यांनी दिले आहे.
Comments
Post a Comment